
पिंपरी : प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये विविध घटक असतात. एखाद्या रक्तदात्याने रक्तदान केल्यावर त्या रक्तामधून लालपेशी, प्लाझ्मा, रक्तबिंबिका (प्लेटलेटस्) अलग केल्या जातात. तुमचे हे रक्तघटक किती दिवस टिकतात. हे तुम्हाला माहित आहे काय ? हे रक्तघटक वापरण्याचा योग्य कालावधी अवघ्या 5 दिवसांपासून ते वर्षभराचा राहतो. त्यांना टिकवून ठेवण्यासाठी रक्तपेढ्यांना उणे तापमानाचा वापर करावा लागतो. मागील अडीच महिन्यांपेक्षा अधिक काळापासून चालू असलेल्या टाळेबंदीचा परिणाम रक्तसंकलनावरही झाला आहे. रक्तदान शिबिरांची संख्या निम्म्याने कमी झाली असून रक्ताच्या मागणीतही लक्षणीय घट झाली आहे. मात्र, महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये तूर्तास पुरेसा रक्तसाठा उपलब्ध आहे.
वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीचे प्रमुख डॉ.तुषार पाटील म्हणाले, "वायसीएम रुग्णालय 3 एप्रिलपासून कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयासमवेत झालेल्या करारानुसार विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया, प्रसूती शस्त्रक्रिया, अपघातांवरील उपचार तेथे होत आहेत. त्यामुळे, रक्ताच्या मागणीत घट झाली आहे. पूर्वी रोज 25 ते 30 पिशव्या इतक्या रक्ताची मागणी असे. आता, हेच प्रमाण 5 ते 8 पिशव्यांवर आले आहे. रुग्णालयाकडे पूर्वीपेक्षा चांगला रक्तसाठा उपलब्ध आहे. यापूर्वी दर महिन्याला 10 ते 12 रक्तदान शिबिरे होत असत. आता, त्याची संख्या निम्म्यावर म्हणजे 5 ते 6 इतकी झाली आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत रक्तसाठा पुरेसा आहे.''
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रक्तापासून होते 3 प्रमुख घटकांचे विलगीकरण
रक्तदात्याच्या रक्तामधून लालपेशी, प्लाझ्मा आणि रक्तबिंबिका (प्लेटलेटस्) हे तीन घटक प्रामुख्याने विलग केले जातात. त्यातील प्लाझ्मा सर्वाधिक म्हणजे 1 वर्ष टिकतो. त्याखालोखाल, लालपेशी 35 दिवस तर रक्तबिंबिका अवघ्या 5 दिवस टिकतात. सध्या वायसीएमच्या रक्तपेढीकडे लालपेशीच्या 319 पिशव्या, प्लाझ्माच्या 250 तर रक्तबिंबिकाच्या 18 पिशव्या उपलब्ध आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोणत्या रक्तगटाच्या व्यक्ती जास्त संख्येने आहेत ?
'बी' रक्तगटाच्या व्यक्ती सर्वात जास्त संख्येने असून त्याखालोखाल 'ओ', 'ए' आणि 'एबी' या रक्तगटाच्या व्यक्तींचा क्रम लागतो. हे रक्तगट 95 टक्के पॉझिटिव्ह तर 5 टक्के निगेटिव्ह असतात, असेही डॉ.तुषार पाटील यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.