
पिंपरी - कोयत्याचा वापर करून दहशत माजविण्यासह वाहन तोडफोडीच्या घटनांचे प्रमाण काही दिवसांपूर्वी कमी झाले होते. मात्र, मागील आठवडाभरात कोयत्याने हल्ला करण्यासह दहशत माजविण्याच्या काही घटना पाठोपाठ घडल्या. यामुळे कोयता बाळगणारे गुन्हेगार आणि टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.