
राहुल हातोले
पिंपरी : स्पर्धा परीक्षेतील जेएमएफसी परीक्षेसह सरकारी वकील पदासाठी सहा ते सात वर्षांपासून लढा सुरू होता. रोज आठ ते दहा तास अभ्यास करणाऱ्या ॲड. क्रांती दीपाली-देवानंद कुरळे यांनी परीक्षेच्या चार महिन्यांपूर्वीच आपले यकृत वडिलांना दिले. यासोबतच पित्ताशयाची पिशवीदेखील काढावी लागली. यामुळे शरीरातील अवयव काढल्यानंतर झालेल्या सर्जरीचा त्रास सहन करीत त्यांनी यश संपादन केले आणि मोरवाडी येथील न्यायालयात सहायक सरकारी अभियोक्ता (सरकारी वकील) पदावर त्या आता कार्यरत आहे.