
पिंपरी : गोकुळाष्टमी अर्थात कृष्ण जन्माष्टमीच्या तयारीचा उत्साह शहरात ठिकठिकाणी दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये रंगविलेली मडकी, सजावटीचे साहित्य, श्रीकृष्णाचे पोशाख, मूर्ती आणि पूजा साहित्याची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून आली. तसेच कृष्ण मंदिरांमध्येही जय्यत तयारी करण्यात येत आहे.