esakal | भोसरीत रोहित्राचा शॉक लागून मजुर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीत रोहित्राचा शॉक लागून मजुर जखमी

भोसरीत रोहित्राचा शॉक लागून मजुर जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भोसरी : येथील भोसरी आळंदी रस्ता चौकातील 'अंकुशराव लांडगे मिनी मार्केट'जवळील विद्युत रोहित्राचा शॉक लागून एक मजूर जखमी झाला. ही घटना शनिवारी (ता. 11) दुपारी एकच्या सुमारास घडली. संजय झाकड (वय ३६) असे त्या मजुराचे नाव असून, तो चाळीस टक्के भाजला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मजूर रोहित्राजवळील टपरीवर चढून टपरीवर पावसाचे पाणी टपरीत येऊ नये म्हणून फ्लेक्स टाकत होता. काम करत असताना जवळील रोहित्राच्या विद्युत तारेला त्याचा धक्का लागून तो रोहित्राच्या बांधण्यात आलेल्या सीमा भिंतीच्या आतमध्ये पडला.

नागरिकांनी वेळीच लक्ष दिल्याने त्याचा जीव वाचला. नागरिकांनी त्याच्या अंगावरील पेट घेतलेले कपडे फाडुन काढले. या मजुरास पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्या मजुरास दुपारी दीडच्या सुमारास ससून रुग्णालयात पाठवण्यात आले.

loading image
go to top