पिंपरी - महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मिळकत कर सवलतीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. त्यांचा लाभ घेण्यासाठी मंगळवार (ता. ३०) शेवटचा दिवस आहे. बुधवारपासून (ता. १) थकबाकीदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे..शहरात सध्या सात लाख ४४ हजारांहून अधिक मिळकतधारक आहेत. आतापर्यंत चार लाख १५ हजारांहून अधिक जणांनी ४८३ कोटींहून अधिक कर भरला आहे.जवळपास तीन लाख ४६ हजार जणांनी ऑनलाइन कर भरून १० टक्के सवलत मिळवली आहे. याचा लाभ घेण्यासाठी मंगळवारी (ता. ३०) शेवटची संधी आहे. एक जुलैपासून थकबाकीदारांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे..उद्यापासून विशेष मोहीमथकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. वारंवार आवाहन करून, तसेच जप्ती नोटिसा बजावूनही कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सर्व विभागीय कार्यालयांना सूचित केले असून, मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.