मावळात कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८८ टक्क्यांवर; मृत्यूचे प्रमाण स्थिर

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात २७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले.

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात शुक्रवारी दिवसभरात २७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. बरे झालेल्या १०२ जणांना घरी सोडण्यात आले. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या पाच हजार १८३ झाली आहे. आतापर्यंत १७७ जणांचा  मृत्यू झाला आहे. चार हजार ५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे ८८ टक्क्यांवर पोचले आहे.  मृत्यूचे प्रमाण मात्र, स्थिर म्हणजे शेकडा ३.४ एवढे आहे.

शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या २७ जणांमध्ये लोणावळा येथील सर्वाधिक १२, तळेगाव दाभाडे येथील आठ, वडगाव येथील दोन, इंदोरी, सोमाटणे, गहुंजे, कान्हे व दारूंब्रे येथील प्रत्येकी एक जणाचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाच हजार १८३ झाली असून, त्यात शहरी भागातील तीन हजार ५९ व ग्रामीण भागातील दोन हजार १२४ जणांचा समावेश आहे. 

तळेगावात सर्वाधिक एक हजार ५५१, लोणावळा येथे एक हजार १९५ व वडगाव येथील रुग्णसंख्या ३१३ एवढी आहे. आतापर्यंत १७७ जणांचा मृत्यू झाला आहे. चार हजार ५६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारी १०२ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या तालुक्यात ४४६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील २७५ लक्षणे असलेले व १७१ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. लक्षणे असलेल्या २७५ जणांपैकी २३७ जणांमध्ये सौम्य व ३८ जणांमध्ये मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत. सध्या सक्रिय असलेल्या ४४६ रुग्णांव३र विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची मावळ तालुका कोविड कक्षाचे समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest corona updates in maval in friday 9 october 2020