Pimpri : सर्वांच्या योगदानाने शहर परिसर स्वच्छतेची काळजी घेऊ; महापौर उषा ढोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सर्वांच्या योगदानाने शहर परिसर स्वच्छतेची काळजी घेऊ; महापौर उषा ढोरे

सर्वांच्या योगदानाने शहर परिसर स्वच्छतेची काळजी घेऊ; महापौर उषा ढोरे

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या प्लॉगेथॉन- चला स्वच्छागृही बनुया या स्वच्छता मोहिमेत सांगवी परिसरातील अबाल वृद्धांनी सहभाग नोंदवत मोहीम यशस्वी केली. यावेळी बोलताना महापौर उषा ढोरे म्हणाल्या, सर्वांच्या योगदानातून शहर व आपला परिसर स्वच्छ राहील याची काळजी घेवू.प्लॉगेथॉन मोहिमेची सुरुवात सांगवी येथील पीडब्लूडी मैदान चौक येथून करण्यात आली यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकासाबरोबरच आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी महापालिकेने स्वच्छतेविषयक विविध उपक्रम हाती घेतले आहेत, त्यास नागरिकांनी सहकार्य करावे.

जुनी सांगवीतील छावा चौक ते दत्त मंदिर व चंद्रमणीनगर ते दापोडी पूल या दरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.२७ किलो सुका प्लास्टिक कचरा उचलण्यात आला. यामध्ये सांगवीतील विविध संघटना, स्वयंसेवी संस्था, बचत गटांतील महिला व नागरिक सहभागी झाले होते.यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, राजु सावळे,महिला बचत गटाच्या महिला, सांगवी जेष्ठ नागरिक संघ, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाच्या सेवक-सेविका, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, संजय मानमोडे, वैशाली रणपिसे, ममता राठोड, आरोग्य मुकादम संतोष जुनवणे, नारायण शितोळे, संतोष कदम आदींसह आरोग्य, स्थापत्य, ड्रेनेज, पाणी पुरवठा, अतिक्रमण आदी विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

loading image
go to top