
पिंपरी : मानवी शरीरातील सर्वांत मोठी रक्तवाहिनी आणि श्वसननलिका या अन्ननलिकेला चिकटून असतात. त्यामुळे अशा ठिकाणी शस्त्रक्रिया करणे अवघड असते. मात्र, तब्बल पंधरा तासांच्या अथक प्रयत्नातून महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) शल्यचिकित्सा (सर्जरी) विभागातील डॉक्टरांनी ती यशस्वी करून दाखवली आहे. तीही दुर्बिण अर्थात एंडोस्कोपीद्वारे. त्यामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले आहे.