सहकार खात्याला गृहनिर्माण संस्थांची जाणून घ्यायची आहे सद्यस्थिती; पण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

  • गृहनिर्माण संस्थांची अभिहस्तांतरणात उदासीनता 
  • सहकार खात्याच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सहकार खात्याकडून सहकारी गृहनिर्माण संस्थांची सद्यस्थितीबद्दल ऑनलाईन सर्वेक्षण चालू झाले आहे. मात्र, त्याला गृहनिर्माण संस्थांचा आतापर्यंत अल्प प्रतिसाद लाभला आहे. अभिहस्तांतरण किंवा मानीव अभिहस्तांतरण करुन घेण्यात संस्थांची उदासीनता दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या अभिहस्तांतरणाची सद्यस्थिती कळविण्याबाबत सहकार खात्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयांमार्फत, अभिहस्तांतरण (कनव्हेन्स डीड) मोहिम उद्दिष्ट पूर्तता व बाकी याबद्दल माहिती सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, संसर्गजन्य कोविड 19 च्या प्रतिबंधासाठी राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे, संस्थेची अभिहस्तांतरणाची माहिती प्रत्यक्ष सादर करणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे, सहकार खात्याने, संस्थांना त्यांच्या अभिहस्तांतरणाची सद्यस्थितीबाबत गुगल लिंकवर माहिती भरण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यातही, संस्थांची उदासीनताच दिसून येत आहे. 
-------------- 
मोदींचे बिहार राजकारण : चीनच्या मुद्द्यावर शब्दही नाही छटपूजेचा मात्र आवर्जून उल्लेख
--------------
मोदींच्या भाषणावर राहुल गांधीना आठवला जुना शेर; काय आहे तो शेर?
--------------
उपनिबंधक शाहूराज हिरे (सहकारी संस्था, पुणे शहर 3) म्हणाले,""एखाद्या संस्थेत 51 टक्के रहिवासी रहाण्यास आल्यावर सहकारी संस्थेची स्थापना होऊ शकते. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यावर संबंधित संस्थेचे अभिहस्तांतरण होणे अपेक्षित असते. विकासक वा बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून 4 महिन्यांत अभिहस्तांतरण होणे आवश्‍यक आहे. मात्र, बांधकाम व्यावसायिक अनेक वर्षे अभिहस्तांतरण प्रलंबित ठेवतात. त्यावरही आता मानीव अभिहस्तांतरणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे, संस्थेच्या अभिहस्तांतरण किंवा मानीव अभिहस्तांतरणाची सद्यस्थितीबद्दल ऑनलाईन सर्वेक्षण चालू करण्यात आले आहे. माझ्या कार्यक्षेत्रात पिंपरी, चिंचवड, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, वाकड, थेरगाव, ताथवडे, पुनावळे, किवळे आदी भाग येतो. त्यामध्ये, सुमारे 3 हजार गृहनिर्माण संस्था आहेत. मात्र, ऑनलाईन सर्वेक्षणात केवळ 122 संस्थांनीच माहिती दिली आहे. त्यात, 18 संस्थांच्या अभिहस्तांतरणाची प्रक्रिया चालू आहे. 33 संस्थांचे अभिहस्तांतरण झाले आहे. तर 71 संस्थांचे अभिहस्तांतरण झालेले नाही.'' 

ऑनलाईन सर्वेक्षण चालूच राहणार ! 
सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद लाभला आहे. मात्र, सर्वेक्षण यापुढेही चालूच राहणार आहे. सर्वेक्षणात गृहनिर्माण संस्थेचे नाव, नोंदणी क्रमांक व दिनांक, अभिहस्तांतरण झाले आहे काय ?, विकसकाच्या सहकार्याने किंवा विकसकाच्या सहकार्याशिवाय झाले आहे ? दस्त नोंदणी क्रमांक व दिनांक, मानीव अभिहस्तांतरण न होण्याची कारणे हा तपशील सर्वेक्षणात संस्थांनी भरुन द्यावयाचा आहे. 

कुठे संपर्क करता येईल.. 
उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर 3, राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, संत तुकारामनगर, पिंपरी, ई-मेल आयडी - 
drcspune3@gmail.com अथवा मोबाईल क्रमांक 9967814442


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little response from housing societies for online survey In PMC and PCMC