लॉकडाऊनमुळे घटले महापालिकेचे बांधकाम परवाना उत्पन्न 

Lock down reduced construction license income
Lock down reduced construction license income

पिंपरी : लॉकडाऊनचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला असल्याचे दिसून येते. बांधकाम परवाना विभागाचे चालू आर्थिक वर्षात 669 कोटी 70 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. मात्र, 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या पहिल्या सहामाहीत केवळ दहा टक्के म्हणजेच 67 कोटी 12 लाख 12 हजार 737 रुपयेच उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे उत्पन्न 260 कोटींनी कमी आहे.
 
महापालिकेच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणजे बांधकाम परवाना विभाग. गेल्या वर्षी या विभागाला 509 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. वर्षभरात झालेली व नवीन होऊ घातलेल्या बांधकामांचा विचार करता 2020-21 च्या अर्थसंकल्पात बांधकाम परवाना विभागाच्या उत्पन्नात सुमारे 160 कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली होती. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न 669 कोटी 70 लाख रुपये गृहीत धरले होते. मात्र, नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या दहा दिवस अगोदरच कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाले आणि सर्व गणितच बिघडले. मिळेल त्या वाहनाने परप्रांतीय मजूर आपापल्या गावी निघून गेले. बांधकामे ठप्प झाली. परिणामी महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आणि सहामाही उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकले नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

उद्दिष्ट पूर्तीची अपेक्षा 
लॉकडाऊन शिथिल झाल्याने बांधकामेही सुरू झाली आहेत. नवरात्र, दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना घरे देण्याच्या उद्दिष्टाने बांधकाम व्यावसायिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बांधकाम परवाना विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळू शकते, अशी अपेक्षा महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

सहामाही आकडे बोलतात 
गेल्या वर्षीचे उत्पन्न : 322 कोटी चार लाख 85 हजार 492 रुपये 
या वर्षीचे उत्पन्न : 67 कोटी 12 लाख 12 हजार 737 रूपये 
फरक (कमी उत्पन्न) : 254 कोटी 92 लाख 72 हजार 755 

दृष्टिक्षेपात उद्दिष्ट 
गेल्या वर्षीचे उत्पन्न : 509 कोटी 
यंदाचे उद्दिष्ट : 669 कोटी 70 लाख 
सुचवलेली वाढ : 160 कोटी 70 लाख 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com