बापरे! पिंपरी-चिंचवडमधील उद्यानांना सोडावे लागले लाखोंच्या महसूलावर पाणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीत शहरातील सात उद्यानांना चार महिन्यांचा सुमारे तीस लाख रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे.

पिंपरी : कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीत शहरातील सात उद्यानांना चार महिन्यांचा सुमारे तीस लाख रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावे लागले आहे. शहराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या उद्यानांमध्ये येणाऱ्या नागरिकांकडून महापालिका तिकीट आकारते. त्या माध्यमातून दरवर्षी सुटीच्या कालावधीत इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये लाखो रुपयांचा महसूल जमा होत असतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरम्यान, कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस सरकारने लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील सर्व उद्याने बंद केली. एप्रिल आणि मे महिना हा उन्हाळी सुट्यांचा हंगाम असतो. त्यामुळे या कालावधीत महापालिकांच्या बागांमध्ये बच्चे कंपनीची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावर्षी मात्र, हे चित्र कुठेच दिसले नाही. लॉकडाउनमुळे घराबाहेर पडण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे कोरोनाच्या प्रार्दुभावाचा फटका महापालिका प्रशासनला सहन करावा लागला आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्यावर्षी उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत शहरातल्या या सात उद्यानांत प्रवेशासाठी आकारण्यात येणाऱ्या तिकीट विक्रीमधून महापालिकेला 32 लाख 45 हजार 449 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये सर्वाधिक 13 लाख 28 हजार 820 रुपयांचे उत्पन्न भोसरी येथील सहलक केंद्राला, तर दुर्गादेवी टेकडीला 10 लाख 72 हजार 370 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्यामुळे महापालिकेने नागरिकांसाठी उद्याने तूर्तात बंद ठेवली आहेत. त्यामुळे या आजाराचा संसर्ग पूर्णपणे कमी झाल्यानंतरच नागरिकांचा उद्यानांमध्ये नियमितपणे वावर सुरु होउ शकतो. त्यामुळे उद्याने उघडण्यासाठी नागरिकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

2019 मध्ये शहरातील उद्यानांना तिकीट विक्रीतून मिळालेला महसूल 

उद्यानाचे नाव...........मार्च..........एप्रिल..........मे..........जून 

दुर्गादेवी उद्यान, निगडी...2,74,220(रु)...2,43,055.....2,64,985.....2,90,110 

भोसरी सहल केंद्र, भोसरी.....2,92,220......3,02,650......4,17,680......3,16,270 

गुलाबपुष्प उद्यान, नेहरुनगर.....9,015.......8,590.......8,850.......7,530 

वीर सावरकर उद्यान, प्राधिकरण.....51,910.....53,405....60,795......44,060 

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, वाकड......1,33,750.....1,25,290.....1,64,360.....92,790 

लक्ष्मीबाई बारणे उद्यान, थेरगाव.....7,500......8,180.......9,330......5,970 

राजश्री शाहू उद्यान, शाहूनगर......14,677.....14,025.....14,102......10,310  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lockdown impact on park revenue at pimpri chinchwad