लॉकडाउनमुळे मोबाईल दुकाने बंद; विद्यार्थ्यांना होतेय अडचण

अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे मोबाईलदेखील गरज बनली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचा वेळ मोबाईलमध्येच जातो.
Mobile
MobileSakal

पिंपरी - सकाळी उठल्यानंतर प्रथम मोबाईल (Mobile) बघायचा. आलेल्या मेसेजला (Message) रिप्लाय देऊन आपल्याकडूनही मित्रांना मेसेज पाठवायचे. दिवसभर फेसबुक, (Facebook) ट्विटर, (Twitter) इंस्टाग्राम, (Instagram) व्हॉट्सॲप (Whatsapp) हाताळायचे. सिनेमा पाहण्यासह आवडीची गाणी (Songs) ऐकायची, इंटरनेटवरून नवनवीन माहिती मिळवायची...असा नीलेशचा दिनक्रम. लॉकडाउनमुळे (Lockdown) घरात असला, तरी दिवस कसा सरला हे कळायचेही नाही. मात्र, अचानक त्याचा मोबाईल बिघडला. दुरुस्तीची दुकानेही बंद. (Shop Close) मोबाईल दुरावल्याने नीलेश अस्वस्थ झाला असून, मानसिक स्वास्थ्यही बिघडले. अशीच अवस्था अनेकांची होत आहे. (Lockdown Mobile Shop Close Student Problem)

अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे मोबाईलदेखील गरज बनली आहे. लॉकडाउनमुळे अनेकांचा वेळ मोबाईलमध्येच जातो. मात्र, अशातच मोबाईल बिघडल्यास दुरुस्तीची दुकाने बंद असल्याने अडचणीत आणखी भर पडत आहेत. मित्र, नातेवाईक यांच्याशी संपर्क तुटत असून, सोशल मीडियापासून दूर राहावे लागत असल्याने अस्वस्थता निर्माण होत आहे. काय करावे, हे देखील सुचत नाही. वर्क फ्रॉम होम करणारे, ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी यांनाही मोबाईल बिघडल्यास विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. आर्थिक गणित कोलमडल्याने नवीन मोबाईल घेणेही शक्य नाही.

Mobile
Corona Updates : पिंपरी-चिंचवडमध्ये आज ४५८ नवे रुग्ण

असा सुरू आहे उद्योग

लॉकडाउनमुळे दुकानांचे शटर बंद आहेत. मात्र, काही व्यक्ती या बंद दुकानांपुढे उभे असतात. दरम्यान, एखादा व्यक्ती दुरुस्तीबाबत विचारणा करण्यासाठी आल्यास त्याच्याकडून मोबाईल घेऊन दुसरीकडूनच दुरुस्त करून आणून देत दुप्पट पैसे घेतले जातात.

दुकानांची आकडेवारी

  • ५० सुमारे नवीन मोबाईल विक्रीची दुकाने

  • २० सुमारे ॲक्सेसरीज दुकाने

  • ६० सुमारे दुरुस्ती दुकाने

दुकान सुरू असताना दिवसाला दहा ते पंधरा मोबाईल येत. मात्र, सध्या सर्वच ठप्प आहे. ओळखीच्या नेहमीच्या ग्राहकांचे फोन येतात; परंतु त्यांना सेवा देणे शक्य होत नाही.

- बालाजी सोनकांबळे, मोबाईल दुकानदार

मोबाईल गरजेची वस्तू बनली आहे. ग्राहकाला आवश्यकता असतानाही सेवा देऊ शकत नाही. त्यामुळे या दुकानांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करणे गरजेचे आहे.

- सलीम रंगूनवाला, सदस्य, पिंपरी मोबाईल असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com