Lonavala News : नववर्षाच्या पूर्वसंध्येस लोणावळा-खंडाळा ‘हाउसफुल्ल’

नववर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबरला लोणावळा-खंडाळ्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉट्स तसेच अनेक सेकंडहोम ‘हाउसफुल्ल’ झाले.
Lonavala Khandala
Lonavala Khandalasakal

लोणावळा - नववर्षाचे स्वागत करताना ३१ डिसेंबरला लोणावळा-खंडाळ्यात नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉट्स तसेच अनेक सेकंडहोम ‘हाउसफुल्ल’ झाले असून, पर्यटकांनी जल्लोष सुरू केला आहे. थिल्लरपणाला आळा घालत घालत नववर्षाचे स्वागत करताना हौस, मजा करण्यासाठी कुटुंबवत्सल पर्यटकांचा कल वाढत असून, येथील हॉटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑर्केस्ट्रा, नृत्य संगितासह नामांकीत कलाकारांच्या संगीतमय मैफलींचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा व खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शनिवार व रविवार सुट्या आल्याने सरत्या वर्षात निरोप देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

हॉटेल्स व रिसॉर्टस् सज्ज

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या स्वागतासाठी लोणावळा व खंडाळ्यातील हॉटेल व रिसॉर्टस् सज्ज झाले आहे. पर्यटनस्थळे, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडावर हौशी ट्रेकर्सची पसंती आहे. ‘थर्टी फर्स्ट’ पार्श्वभूमीवर पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

पवन मावळ, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडसह लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉइंट, खंडाळा येथील सनसेट पॉइंट येथे पर्यटकांसह हौशी ट्रेकरची पसंती आहे. पर्यटकांचे हॉटेल व रिसॉर्टपेक्षा खासगी बंगल्यांनाच अधिक प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे.

पोलिसांच्या सूचना

  • आस्थापनांनी आवश्यक तात्पुरते कायदेशीर परवाने घ्यावेत

  • विनापरवाना स्पीकर, डेक, डीजे वाजविल्यास कारवाई

  • हॉटेलचालकांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी

  • सार्वजनिक ठिकाणी, मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाई

  • हॉटेल, रिसॉर्टमध्ये संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तूंची माहिती द्यावी

दक्षता घेण्याची गरज

वाढत्या गर्दीच्या व्यावसायिकदारांना खबरदारी बाळगावी लागणार आहे. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी करणाऱ्यांवर व मद्यपान करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्याने पर्यटकांना दक्षता घ्यावी लागणार आहे. व्यावसायिकांनी कायद्याचे पालन करावे, तसेच पर्यटकांनी जल्लोष करताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहयक पोलिस अधीक्षक तथा लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com