Maharashatra Kesri: महाराष्ट्र केसरीसाठी किताबासाठी सोमवारी वाकडला निवड चाचणी

maharashtra kesri
maharashtra kesri sakal
Published on

Maharashatra Kesri : राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी सोमवारी (ता. २३) वाकड येथील कावेरीनगर क्रीडा संकुलात पिंपरी-चिंचवड निवड चाचणी कुस्ती स्पर्धा होणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे व सरचिटणीस संतोष माचूत्रे यांनी दिली.

राज्य कुस्तीगीर संघातर्फे ६६ वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन आणि राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती किताब स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागासाठी शहरातील पहेलवानांमधून निवड केली जाणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघातर्फे सोमवारी वाकड येथील कावेरीनगर क्रीडा संकुलात निवड चाचणी कुस्ती स्पर्धा वरिष्ठ गट माती व गादी विभागात होणार आहे.

maharashtra kesri
Maharashtra Politics: अजित पवार गटाला तीनच जागा? शिंदे गटाच्या दाव्याने अजित पवार गटात अस्वस्थता

त्यासाठी पहेलवानांची वजने स्पर्धेच्या दिवशी अर्थात सोमवारी (ता. २३) सकाळी नऊ ते ११ या वेळेत क्रीडा संकुलात घेण्यात येतील. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल. वरिष्ठ माती व गादी विभागासाठी ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२, ९७ किलो वजनगटात आणि महाराष्ट्र केसरी किताब लढतीसाठी ८६ ते १२५ किलो वजन गटात स्पर्धा होईल. अधिक माहितीसाठी संपर्क ः संतोष माचुत्रे ः ९८२२०४९४८८

maharashtra kesri
Mumbai Crime : लेडीज बारवर पोलिसांनी टाकला छापा अन्...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com