चिंताजनक : मावळात कोरोनाचा आणखी रुग्ण; आता संख्या झाली...

चिंताजनक : मावळात कोरोनाचा आणखी रुग्ण; आता संख्या झाली...

तळेगाव स्टेशन : मावळ तालुक्यातील माळवाडी येथील एका 37 वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, लक्षणे दिसताच संबंधित महिला परिचारिकेने स्वतःहून शनिवारी (ता. 9) पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करून घेतल्याची माहीती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सोमवारी (ता. ११) सायंकाळी नगरपरिषदेतील पत्रकार परिषदेत दिली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, नोडल अधिकारी गुणेश बागडे उपस्थित होते. त्यामुळे मावळातील कोरोना बाधितांची संख्या दोन झाली आहे. मागील आठवड्यात आढळलेली  पहिली बाधित महिला आणि आताची दुसरी बाधित महिला या दोन्ही पुण्यातील एकाच खासगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करतात. संबंधित महिलेच्या पतीसह तिच्या दोन मुलांना तत्काळ पुण्यातील औंध येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी माळवाडी येथील संबंधित भाग सील केला आहे. दरम्यान प्रशासनाला माहिती न कळवल्याबद्दल संबंधित खासगी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनास नोटीस पाठवणार असल्याचे तहसीलदार म्हणाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com