
चाकण : येथील औद्योगिक वसाहतीतील वराळे (ता. खेड) येथे सोमवारी (ता. २०) कंपनीतील व्यवस्थापकावर दोन हेल्मेटधारी आरोपींनी दुचाकीवरून येऊन दोन गोळ्या झाडल्या. यात व्यवस्थापक गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, दोन दिवस उलटून गेले तरी त्या आरोपींचा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला तपास लागला नाही.