

आशा साळवी
पिंपरी : आरक्षणाचे नियम आणि सरकारी बंधनांमधून सवलती मिळत असल्याने शाळांना अल्पसंख्याक दर्जा महत्त्वाचा आहे. याचाच गैरफायदा घेत पिंपरी चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नऊ नामांकित शिक्षण संस्था चालकांनी यावर्षी ‘भाषिक अल्पसंख्याक दर्जा मिळविला आहे. अशा शाळांमध्ये किती टक्के मारवाडी, कन्नड, कोकणी, उर्दू भाषा शिकविण्यात येतात, हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.