मावळवासीयांना ज्याची भीती होती, अखेर तेच झालं...

मावळवासीयांना ज्याची भीती होती, अखेर तेच झालं...
Updated on

तळेगाव स्टेशन : आजपर्यंत सुरक्षित असलेल्या मावळ तालुक्यात अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शिवाजीनगर, पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 

तळेगाव स्टेशन येथे राहणाऱ्या आणि पुण्यातील शिवाजीनगर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करणारी ही महिला कामानिमित्त रोज ये-जा करते. एका खासगी लॅबमार्फत गेल्या चार मे रोजी स्वॅब नमुने घेतल्यानंतर बुधवारी (ता. ६) सायंकाळनंतर आलेल्या रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार तळेगाव, वराळे, माळवाडी, कातवी, आंबी, वारंगवाडी, कोटेश्वरवाडी, सीआरपीएफ कँप तसेच, वडगावचा काही भाग १४ दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. सोमाटणे, इंदोरी, परंदवाडी आदी ठिकाणी बफर झोन जाहीर करण्यात आला आहे.

तळेगावात ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्वरित तपासणी करून संबंधित संस्थांनी सोय करावी, अन्यथा इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाइन करणार असल्याचे बर्गे म्हणाले. सर्व प्रवेशद्वारांवर तपासणी कडक करून कंटेन्मेंट झोनमधील सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करणार आहेत. तसेच, केवळ भाजीपाला, किराणा, दूध आणि मेडिकल अशा अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार सुनिल शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी आदी उपस्थित होते. तळेगावात ये-जा करणाऱ्यांसाठी कडक निर्बंध घालण्याची सूचना शेळके यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com