'मुलीला दे, नाहीतर तलवारीने कापीन', पत्नीला धमकी; सासरच्यांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

पत्नीला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करीत पतीने तलवारीने कापण्याची धमकी दिली. माहेराहून काहीही न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी : पत्नीला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण करीत पतीने तलवारीने कापण्याची धमकी दिली. माहेराहून काहीही न आणल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पती सूरज गुलाबचंद यादव (वय 32), नणंद गीता यादव व सासू राजकुमारी यादव (सर्व रा. शास्त्रीनगर, डीलक्‍स चौक, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. आरोपी पती वेगवेगळ्या कारणांवरून वेळोवेळी पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत असे. फिर्यादी त्यांच्या माहेरी असताना आरोपी त्यांच्या घरात शिरला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'तू मला माझ्या मुलीला दे, नाहीतर मी तुला तलवारीने कापून टाकेल', अशी धमकी दिली. तसेच, माहेराहून काही एक आणले नसल्याने सर्व आरोपींनी मिळून विवाहितेला वेळोवेळी टोमणे मारून शिवीगाळ करीत त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marital harassment in pimpri chinchwad