हुंड्यासाठी होत होता छळ; भोसरीतील विवाहितेने उचलले मोठे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 December 2020

सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वेळोवेळी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे घडली. 

पिंपरी : सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वेळोवेळी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना भोसरी येथे घडली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

विद्या तुकाराम मुद्रासे (वय 26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विद्या यांचा पती तुकाराम चंद्रकांत मुद्रासे (वय 27, रा. पांडवनगर, चक्रपाणी रोड, भोसरी, मूळ-लातूर), सासू उर्मिला चंद्रकांत मुद्रासे (वय 48), सासरा चंद्रकांत मुद्रासे (वय 54), नणंद महादेवी दत्तात्रेय मोकाशे (वय 23), चुलत नणंद श्यामा शिवराम मोकाशे (वय 23, रा. आजमसोंडा खुर्द, ता. चाकूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्या व तुकाराम यांचे 14 मे 2020 रोजी लग्न झाले. त्यानंतर माहेराहून सोने, संसारोपयोगी वस्तू आणणे. तसेच, कौटुंबिक कारणावरुन सासरच्या मंडळींनी विद्या यांना शारीरिक व मानसिक त्रास देवून मारहाण केली. वारंवार होणाऱ्या या छळाला कंटाळून विद्या यांनी 19 नोव्हेंबर रोजी राहत्या घराच्या इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: married women attempt to suicide by jumping on building in bhosari