

60 Fire Personnel Rush to Action as Massive Blaze Breaks Out in Chikhli
sakal
पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी परिसरातील श्री महादेव मंदिराजवळील भंगार गोदामांना मंगळवारी (ता. २३) पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. त्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. परिणामी काही नागरिकांना त्रास झाला. पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.