
Ramai Ambedkar Jayanti: राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी आणि त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचा १२७ वा जयंती महोत्सव पिंपरी-चिंचवड इथं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमानं साजऱ्या झालेल्या या उत्सवात विविध उपक्रम राबवण्यात आले. ५ ते ७ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत झालेल्या या कार्यक्रमांना महिला वर्गानं मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.