पिंपरी - अवघ्या दहा वर्षे वयामध्ये आंतररराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये तीन वेळा अव्वल स्थानी, एक-दोन नाही; तर तब्बल तेरा विक्रम; अडीच वर्षे वय असताना पहिल्या विक्रमाची नोंद! ही कामगिरी आहे अवीर जाधव याची..गेल्या तीन वर्षांपासून ‘एसओएफ’ अर्थात द सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनच्या स्पर्धेत अवीर चमकदार कामगिरी करत आहे. दरवर्षी जगभरातून जवळपास ९६ हजार शाळांमधून लाखो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असतात. यात अवीरचे यश कौतुकास्पद ठरत आहे.अवीरला लहानपणापासूनच खेळण्यांपेक्षा जगाचे नकाशे पाहायची आवड होती. अवघे अडीच वर्षे वय असताना त्याने २०८ देशांची नावे पाठ केली. त्याचा हा पहिला विक्रम इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आला. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही..२०८ देश, या देशांची राजधानी, झेंडे, राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय भाषा हे देखील पाठ करत त्याने एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सहा; तर इंडिया बुक ऑफ वर्क रेकॉर्डमध्ये पाच विक्रम नोंदविले. त्याच्या या विक्रमाचे सर्वत्र होत आहे..पहिलीपासून तयारीअवीर सध्या हिंजवडीतील आरआयएस शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे. त्याने अवीरने इयत्ता पहिलीपासून ऑलिम्पियाड स्पर्धांची तयारी सुरू केली. याची पूर्ण तयारी त्याची आई रिंका या करून घेतात. इयत्ता पहिलीपासून त्याने ‘द सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन’च्या स्पर्धेत सहभागी होण्यास सुरुवात केली आणि सलग तीनही वर्षे यशही मिळवले आहे. या संस्थेने घेतलेल्या गणित व इंग्रजी ऑलिम्पियाडमध्ये पहिला क्रमांक त्याने पटकावला आहे. तर, इतर स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी केली आहे..पहिल्यापासूनच अवीरला खेळणी खेळण्यापेक्षा नकाशे पाहण्याची आवड होती. त्यातूनच आम्ही त्याला नकाशे ओळखण्यात आणखी प्रोत्साहन दिले. तेव्हा त्याने पहिल्यांदाच सव्वादोन मिनिटांत २०८ देश व भूभागांची नावे सांगण्याचा विक्रम केला. या विक्रमासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडून त्याला गौरविण्यातही आले आहे.- रिंका जाधव, अवीरची आई.ऑलिम्पियाडच्या तयारीसाठी आम्ही त्याला कोणतेही कोचिंग किंवा क्लास लावले नाही. त्याची आई घरीच त्याच्याकडून या स्पर्धेची तयारी करून घेत आहे. त्यामुळे अवीरच्या या यशात तिचा मोठा वाटा आहे.- प्रदीप जाधव, अवीरचे वडील.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.