पिंपरी - आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने गणित शिकविण्याची पद्धत अभिजित भांडारकर यांनी आत्मसात केली आहे. त्यामुळे आता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना किचकट असणारा गणिताचा विषय सोपा झाला आहे. माध्यमिक शिक्षणात गणित विषय कसा आनंददायी होईल, यादृष्टीने ‘सकाळ विद्या’ आणि भांडारकर ॲकॅडमी यांच्या वतीने उद्या विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगुळकर सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. सर्वासाठी विनामूल्य असणाऱ्या या चर्चासत्रामध्ये भांडारकर ॲकॅडमीचे संस्थापक संचालक अभिजित भांडारकर मार्गदर्शन करणार आहेत. उच्च शिक्षणातील उत्तुंग भरारीची बीजे ही मुलांच्या माध्यमिक शिक्षणात म्हणजेच सातवी ते दहावीच्या अभ्यासात रुजलेली असतात.
बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. त्यामुळे अभ्यासाचे तंत्र व योग्य गुरूचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीला सरावाची गरज असते. कोणत्याही खेळात तरबेज होण्यात सरावाची गरज असते. गणितही त्याला अपवाद नाही.
एकदा का सूत्रे पाठ झाली, गणित सोडवायची पद्धत कळाली की गणित सोपे जाते. गणितातील क्लिष्ट असे हजारापेक्षा जास्त सूत्रे भांडारकर सांगणार आहे. गणित विषय अवघड वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे चर्चासत्र उपयुक्त ठरणार आहे. तसेच यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासही मदत होणार आहे.
या चर्चासत्रात विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे. यातून विद्यार्थ्यांला निश्चितपणे पुढची वाटचाल सोपी होणार आहे.
चर्चासत्राविषयी...
कधी - रविवारी, १६ मार्च २०२५
केव्हा - सायंकाळी ५ ते ८ वा.
कुठे - ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण
वक्ते - अभिजित भांडारकर
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य
अधिक माहितीसाठी संपर्क : ९३०७७१५९०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.