पिंपरी : महापौर, पक्षनेत्यांकडून कंटेन्मेंट झोनची पाहणी; नागरिकांना केली ही विनंती

टीम ई सकाळ
शनिवार, 27 जून 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेकडून कोरोना प्रादुर्भाव रोखणे व रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेकडून कोरोना प्रादुर्भाव रोखणे व रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी शहरातील चिंचवड भागातील कंटेन्मेंट झोनची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

चिंचवड परिसरातील दौऱ्यात चिंचवडे नगर, मुंजोबा वसाहत, हनुमान मंदिर, शिवनगरी, हरिओम कॉलनी, गणेश कॉलनी, पांढारकर वस्ती, दळवी नगर, नक्षत्रम बिल्डिंग, प्रेमलोक पार्क या भागातील कंटेन्मेंट झोनला भेट दिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापौर ढोरे यांनी या भागातील नागरिकांची विचारपूस केली, तसेच काळजी घेण्याचे सांगितले. त्याचबरोबर, या भागात वेळोवेळी औषध फवारणी होते की नाही, वैद्यकीय कर्मचारी घरी येऊन आपली चौकशी करतात की नाही, तसेच आपणास साबण, मास्क उपलब्ध झाले की नाही याबाबत विचारपूस केली. तसेच, नागरिकांनी महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत जास्तीची खबरदारी घेऊन आरोग्याची काळजी घ्या. वारंवार हात धुवा, क्वारंटाईन केलेल्यांनी एकमेकांशी संवाद साधतांना चार फूट अंतर ठेवून मास्क लावूनच संभाषण करावे, अशी विनंती नागरिकांना केली.

हेही वाचा- Video : आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे प्रदर्शन होणार मोशीत

पक्षनेते ढाके यांनी सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागरिकांकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्यांची काळजी घ्यावी. तसेच, बाधित रुग्णांशी प्रथमदर्शी संपर्कातील व्यक्तींची तातडीने स्वॅब टेस्ट करा, आणि त्या क्षेत्रीय कार्यालयातील टीमकडून करून घ्या, अशी सूचना केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, स्वीकृत सदस्य विभीषण चौधरी, ब क्षेत्रीय अधिकारी प्रशांत जोशी, प्रभावती गाडेकर, डॉ. किशोरी नलावडे, डॉ. विद्या फड, उपअभियंता उमेश मोने आदी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor inspects containment zone in pimpri chinchwad