esakal | Crime News : भोसरीतील गुन्हेगारी टोळीवर मोका
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News : भोसरीतील गुन्हेगारी टोळीवर मोका

भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे. 

Crime News : भोसरीतील गुन्हेगारी टोळीवर मोका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टोळीप्रमुख मंगेश शुक्राचार्य मोरे (वय 23, रा. कृष्णापार्क, भोसरी), रोशन हरी सावडतकर (वय 21, रा. भोसरी), अमित सुभाष शेकापुरे (लाडू, वय 21, रा. चक्रपाणी रोड, भोसरी), शुभम अजय वानखेडे (वय 20, रा. अशोकनगर, भवानी पेठ, पुणे), प्रणेश चंद्रकांत घोरपडे (वय 22, रा. दिघी), शुभम बलराम वाणी (वय 22, रा. दिघी), वैभव तानाजी ढोरे (वय 21, रा. अशोकनगर, भवानीपेठ, पुणे), अभिजीत ऊर्फ माया गणेश गांगले (वय 22, रा. शाहूनगर, लातूर), ओम अशोकराव मठपती (वय 22, रा. डी ब्लॉक, लातूर), निखिल राजकुमार ढाबळे (वय 23, रा. सावंतनगर, दिघी) अशी या टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे गुन्हेगार वर्चस्व व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूद्ध मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे पाठविला होता. दरम्यान, शुक्रवारी (ता. 30) अतिरिक्त आयुक्तांनी या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.