पिंपरी : कोरोना योद्ध्यांचे हात बळकट करण्यासाठी केली 'लाख' मोलाची मदत

आशा साळवी
शनिवार, 23 मे 2020

रोटरी क्‍लब ऑफ निगडी आणि पूजा कास्टिंग यांच्या विशेष सहकार्याने जिजामाता रुग्णालयास व्हेंटिलेटर भेट देण्यात आले.

पिंपरी : कोरोनाच्या योद्ध्यांना लढा आणखी बळकट करण्यासाठी कंपन्या, सामाजिक संस्थांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागास लाखो रुपयांच्या किमतीचे वैद्यकीय साहित्य व मशिन पुरविण्यात येत आहे. या निमित्ताने महापालिकेला लाख मोलाची मदत मिळत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिजामाता रुग्णालयास व्हेंटिलेटर मशिन भेट

रोटरी क्‍लब ऑफ निगडी आणि पूजा कास्टिंग यांच्या विशेष सहकार्याने जिजामाता रुग्णालयास व्हेंटिलेटर भेट देण्यात आले. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, डॉ. दाढेवार यांच्याकडे हे मशिन सुपूर्द केले. यावेळी निगडी रोटरी क्‍लबचे अध्यक्ष विजय काळभोर, पूजा कास्टींगचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुलकर्णी, क्‍लबचे नियोजित अध्यक्ष डॉ. प्रवीण घाणेगावकर, राकेश सिंघानिया, राणू सिंघानिया, डॉ. संजय देवधर आदी उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले, "सध्याच्या कोरोनाच्या महामारीमध्ये व्हेंटिलेटरची अत्यावश्‍यकता असल्याने आम्ही पुढाकार घेतला. दोन मशिन घेण्यासाठी नऊ लाख रुपये खर्च करून तातडीने हे मशिन मागवून घेतले."

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय साहित्य भेट

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता पर्यावरण संवर्धन समितीच्या या पुढाकाराने युनायटेड वे, दिल्ली आणि वर्पूल संस्थेच्या वतीने ट्रिपल लेयर मास्कचे 2000 नग, युरो ग्रेड मास्कचे 250 नग, हॅन्ड ग्लोव्हज 2000 नग, पीपीई किट 400 नग, हॅन्डवॉशचे 130, सॅनिटायझर 130, थर्मामीटर 3 नग, असे पाच लाखांपेक्षा जास्त रकमेचे अत्यावश्‍यक वैद्यकीय साहित्य महापालिकेस सुपूर्द करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, कंपनीचे संतोष मोरे आणि राजेंद्र जानराव, पर्यावरण तज्ज्ञ विकास पाटील, संजीवनी मुळे, विनिता दाते, हिरामण भुजबळ, निळकंठ पोमण, विजय वावरे आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical equipment and machines were given to the medical department of PCMC