
पिंपरी : कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील एकाला पिस्तुल व दोन जिवंत काडतुसांसह गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. ही कारवाई हिंजवडी येथे करण्यात आली.
दत्ता उर्फ बबलु बाळू मालपोटे (वय 26, रा. कात्ररखडकगाव, ता. मुळशी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मालपोटे याच्याकडे पिस्तुल असून तो हिंजवडीतील बापुजी बुवा मंदीराजवळ कोणाला तरी भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यास पकडण्यासाठी पोलिसांनी बापुजीबुवा मंदीर परिसरात सापळा रचला.
दरम्यान, त्याला पोलिस आल्याची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक देशी बनावटीचे पिस्तुल व त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे सापडली. त्याला ताब्यात घेऊन बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
आरोपी मालपोटे हा निलेश घायवळ टोळीचा सदस्य असून त्याच्यावर पौड, कोथरुड, लोणावळा पोलिस ठाण्यात खून, दरोडा, अपहरण, आर्म ऍक्ट असे गंभीर स्वरूपाचे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. त्याने निलेश गावडे व इतर साथीदारांच्या मदतीने 2018 मध्ये गजानन मारणे टोळीचा सदस्य राजु कुंभार याचा खून केला होता.\
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.