Pimpri : व्यापारी व रहिवाशांनी ग्रेड सेपरेटचे काम पाडले बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यापारी व रहिवाशांनी ग्रेड सेपरेटचे काम पाडले बंद

व्यापारी व रहिवाशांनी ग्रेड सेपरेटचे काम पाडले बंद

वाकड : डांगे चौक थेरगाव येथील ग्रेड सेपरेटरच्या गणेश नगर क्रॉसिंग जवळील वाढीव रस्ता दुभाजकाला जमलेल्या स्थानिक रहिवाशी, व्यापारी व थेरगाव सोशल फाऊंडेशनच्या सद्स्यांनी विरोध करीत मंगळवारी दु (ता. २३) दुपारी काम बंद पाडले. त्यामुळे येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.यावेळी महापालिकेचे उपअभियंता चद्रशेखर धानोरकर, कनिष्ठ अभियंता संजय चव्हाण व काम करणारे ठेकेदार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकूण घेत १५ डिसेंबरला प्रायोगिक तत्वावर ग्रेड सेपरेटर चालू करू येथे ट्रॅफिक समस्या उद्भवली नाही तर काम जैसे थे ठेवू अन्यथा पुढे काम करावेच लागेल अशी बाब उपस्थितांना सांगितल्याने वातावरण काही प्रमाणात निवळले. क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरु असलेल्या रस्ता दुभाजकाचे काम थांबले नाही तर प्रखर जनआंदोलन करण्याचा ईशाराही महापालिका प्रशासनाला देण्यात आला.

गणेशनगर मधील नागरीक व व्यापाऱ्यांसाठी रस्ता क्रोसिंग हे गणेश मंदिराजवळच मिळावे त्यासाठी दोन्ही बाजुला ५ मिटरचे स्पीड ब्रेकर करावे, त्या-त्या ठिकाणी झेब्रा क्रोसिंग व अन्य उपाय योजना कराव्यात या मागणीचे निवेदन देण्यात आले.तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार असल्याचे उपस्थितांनी सांगितलेथेरगाव सोशल फाऊंडेशनचे अनिकेत प्रभु, राहुल सरवदे, निलेश पिंगळे, गणेश डांगे, अनिल घोडेकर, श्रीकांत धावारे, अमोल शिंदे, शंतनु तेलंग, यश कुदळे, शाहु काटे उपस्थित होते.

रहिवाशी व व्यापाऱ्यांनी दुभाजक वाढवू नये या व अन्य मागणीचे निवेदन आम्हाला दिले आहे त्यानुसार आमचे वरिष्ठ अधिकारी व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्यक्षात पाहणी करूनकाय ते पुढील नियोजन केले जाईल.

चंद्रशेखर धानोरकर (महापालिका, उपअभियंता)

loading image
go to top