पिंपरी - पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी (पीसीएमसी) मार्गिकेचा निगडीतील भक्तीशक्ती चौकापर्यंत विस्तार केला जाणार आहे. त्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे मुंबई-पुणे महामार्गाच्या परिसरातील चिंचवड, आकुर्डी, निगडी या गावांसह चिखली, तळवडे, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर, प्राधिकरण, रावेत, किवळे, मामुर्डी या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.