hinjewadi shivajinagar metro
sakal
पिंपरी - माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो सेवा जुलैमध्ये सुरू करण्याचा दावा प्रशासनाने केला होता. पण, आता सुरक्षाविषयक प्रमाणपत्र व अंतर्गत तपासणी अहवालाअंती ही सेवा आणखी लांबणीवर पडली आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या १२ स्थानकांची कामे व सद्यःस्थितीचा आढावा ‘सकाळ’ प्रतिनिधीने घेतला. त्यापैकी आठ स्थानकांची कामे ९० टक्के पूर्ण, तर अन्य ४ स्थानकांची कामे अपूर्ण आढळली.