पिंपरी - तुम्ही मेट्रोने प्रवास करताय, अगदी योग्य निर्णय घेतलाय. पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकलंय. कारण, तुम्ही एकावेळी मेट्रोने प्रवास करून १.६५ ग्रॅम कार्बन डायऑक्साइडचे (सीओ-२) उत्सर्जन कमी करत आहात. मेट्रोकडील आकडेवारीनुसार दररोज सरासरी एक लाख ६० हजार नागरिक प्रवास करत आहेत. म्हणजेच दररोज २६४ किलोग्रॅम ‘सीओ-२’चे उत्सर्जन वाचवून पुणे व पिंपरी-चिंचवडचे तापमान कमी ठेवण्यात मोलाचा वाटा उचलत आहेत.