Pune Metro
sakal
पिंपरी - पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील बहुचर्चित मेट्रोचा पहिला टप्पा खुला करण्याची तयारी सुरू असून, येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ती प्रवाशांसाठी धावेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांनी शुक्रवारी (ता. २८) मेट्रो लाईन-३च्या प्रकल्पाचा सखोल आढावा घेतला.