hinjewadi Traffic warden clearing a drain to allow stagnant water to flow away.
sakal
हिंजवडी - देशातील प्रमुख ‘आयटी हब’ हिंजवडीमध्ये दररोज तब्बल पाच ते सात लाख वाहनांची वर्दळ होत असताना संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा डोलारा अवघ्या २७ वाहतूक पोलिसांच्या खांद्यावर उभा आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक नियोजन वारंवार कोलमडून हजारो आयटी कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना रोज तासन् तास कोंडीत अडकून मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी वाईट होत आहे.