खासगी रुग्णालयांतील खर्च सरकारने द्यावा; आमदार जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

सरकारी रुग्णालयांत बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होत आहेत. त्यांचा उपचार खर्च सरकारने करावा. सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

पिंपरी - सरकारी रुग्णालयांत बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्ण खासगी रुग्णालयांत दाखल होत आहेत. त्यांचा उपचार खर्च सरकारने करावा. सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तातडीने लागू करावी, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमदार जगताप यांनी निवेदनात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना संसर्ग वाढला आहे. मृत्यू होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तातडीने लागू करावी. सरकारी रुग्णालयांत आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे. बेड मिळत नसल्याने व व्हेंटिलेटरअभावी मृत्यू होत आहेत. सर्व खाजगी रुग्णालयांतील डॉक्‍टर्स, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, अन्य सुविधांचे एकत्रीकरण केल्यास बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. सरकारी रुग्णालयांवरील ताण कमी होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Laxman Jagtap demand Chief Minister government pay expenses private hospitals