मनसेने केला मोकळ्या खुर्चीचा हार घालून सत्कार

रमेश मोरे
Thursday, 21 January 2021

जुनी सांगवीत पालिकेचे करसंकलन विभाग कार्यालय आहे.यात जुनी सांगवी,नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आदी उपनगरांचा समावेश आहे.या कार्यालयात अंतर्गत अंदाजे ६५ ते ७० हजार मिळकतकर आहेत. गेल्या दिड महिन्यांपासून या कार्यालयात प्रशासन अधिकारी उपलब्ध नसल्याने  नागरीकांना कामाबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

जुनी सांगवी(पुणे) : मनसेची आंदोलने खळ्ळखटट्याक म्हणुन सर्वांना परिचित आहेत. मात्र जुनी सांगवी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन कार्यालयात करसंकलन प्रशासन अधिकारी गेली दीड दोन महिन्यांपासून उपलब्ध होत नाही. त्यामुळे मनसेकडून त्या अधिकाऱ्यांच्या मोकळ्या खुर्चीला पुष्पहार घालून अनोखे आंदोलन करण्यात आले. या कार्यालयामध्ये गेली दीड महिन्यांपासून प्रशासन अधिकारी उपलब्ध होत नसल्याने नागरीकांना गैरसोय व अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही बाब लक्षात घेवून प्रशासनाचे या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर उपाध्यक्ष राजु सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयात जाऊन होणा-या अडचणी बद्दल माहिती घेत प्रशासन अधिका-याच्या खुर्चीला पुष्पहार घातला.

जुनी सांगवीत पालिकेचे करसंकलन विभाग कार्यालय आहे.यात जुनी सांगवी,नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे निलख आदी उपनगरांचा समावेश आहे.या कार्यालयात अंतर्गत अंदाजे ६५ ते ७० हजार मिळकतकर आहेत. गेल्या दिड महिन्यांपासून या कार्यालयात प्रशासन अधिकारी उपलब्ध नसल्याने  नागरीकांना कामाबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यापुढेही अशीच परिस्थिती राहिल्यास मनसेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याबाबत पालिका प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की,यापुढे जर कायमस्वरूपी प्रशासन अधिकारी मिळाला नाही. तर मनसेच्या वतीने अधिकारी मिळेपर्यंत महापालिका पिंपरी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात येईल.

याबाबत करसंकलन कार्यालयाशी संपर्क साधला असता संपर्क होवू शकला नाही.यावेळी मनसेचे शहर उपाध्यक्ष राजू सावळे, सुरेश सकट,विशाल पाटील, महेश केदारी, मंगेश भालेकर, अलेक्स मोझेस, अनिल भुजबळ, प्रदीप गायकवाड, राकेश रावल, गणेश माने, रुस्तम इराणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS felicitated by wearing a necklace of open chairs