

Moshi Depot Accident Relief
esakal
पिंपरी : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या आठ कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना पिंपरीतील यशवंतनगर ‘एसआरए’ प्रकल्पात मोफत सदनिका देण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात येईल.
ही दुर्घटना आठ जुलै रोजी झाली होती. त्यात नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना मोफत सदनिका देण्याचा ठराव महापालिकेच्या सभेत दोन सप्टेंबरला मंजूर झाला होता. त्यानुसार ‘एसआरए’ने (झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभाग) कार्यवाही केली. पाच नोव्हेंबरच्या मान्यताप्राप्त प्रस्तावानुसार आठ वारसांना सदनिका वाटपाचा आदेश जारी करण्यात आला.