मोशीकरांना मिळाले नवीन पिन कोडसह स्वतंत्र पोस्ट कार्यालय

वाढती नागरी व औद्योगिक वसाहत आणि स्वतंत्र जागेची समस्या यामुळे गेली अनेक वर्षे मोशी पोस्ट ऑफीसचा प्रश्न प्रलंबित होता.
Moshi Post Office
Moshi Post OfficeSakal
Summary

वाढती नागरी व औद्योगिक वसाहत आणि स्वतंत्र जागेची समस्या यामुळे गेली अनेक वर्षे मोशी पोस्ट ऑफीसचा प्रश्न प्रलंबित होता.

मोशी - वाढती नागरी व औद्योगिक वसाहत आणि स्वतंत्र जागेची समस्या (Problem) यामुळे गेली अनेक वर्षे मोशी पोस्ट ऑफीसचा (Moshi Post Office) प्रश्न प्रलंबित होता. गेल्या 20 वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरीक व दैनिक सकाळ वृत्तपत्राने (Sakal Newspaper) ही मागणी लावून धरली होती. पोस्ट मास्तर रघुनाथ आल्हाट यांनी स्थानिक माजी नगरसेविका सारिका बो-हाडे यांच्याकडे केलेल्या पोस्ट कार्यालयाच्या जागेसाठी केलेली मागणी व सारीका बो-हाडे यांनीही ती जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे मोशीकरांची स्वतंत्र पोस्ट कार्यालयाची प्रतिक्षा संपली असून मोशीकरांना नवीन पिन कोडसह स्वतंत्र पोस्ट कार्यालय मिळाले आहे. असे प्रतिपादन पुणे रिजनच्या जनरल पोस्ट मास्तर मधुमिता दास यांनी केले. मोशीतील बोऱ्हाडे वाडीतील सावतामाळी नगर येथे शुक्रवारी (ता. 1) जनरल मधुमीता दास यांच्या हस्ते या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार महेश लांडगे, डाकसेवा निर्देशक सिमरन कौर, माजी नगरसेविका सारीका बो-हाडे, माजी नगरसेवक वसंत बोराटे, पुणे ग्रामीण पोस्ट अधिक्षक सतीश गोपीराजन, डाक घर अधीक्षक पि. बी. एरंडे साहाय्यक अधीक्षक गणेश वडूरकर, आळंदी पोस्ट मुख्य एसपीएम उषा हवाले, सुजता ठाकुर, माधुरी मुतगेकर, हनुमंत गुरवे नितीन, सी. एम. नदाफ, के. एस. पारखी, मोशी पोस्ट ऑफीसचे मावळते बि. पी. एम. रघुनाथ आल्हाट, एस. पी. एम. योगेश चव्हाण, अनिल खर्डेकर आदी उपस्थित होते.

हे पोस्ट कार्यालय पुणे शहराच्या कार्यालयाला जोडल्यामुळे आता नागरिकांना अडचणी येणार नाहीत. पोष्ट खात्याच्या वतीने मोशीचा जुना 412105 हा पिन कोड रद्द करुन मोशी पोस्ट कार्यालयाला आता 411070 हा नवीन पिनकोड देण्यात आला आहे. मोशी परिसरात 20 वर्षापासून आळंदी पोस्ट आफीस होते. ग्रामीण पीन कोड 412105 असल्यामुळे खूप अडचणी येत होत्या शिवाय पोस्टमनचीही कमतरता भासत होती. या स्वतंत्र कार्यालयामुळे व वाढविलेल्या पोस्टमनच्या संख्येमुळे आता अडचणी येणार नाहीत. असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केले तर नवीन आधार केंद्र पोस्ट ऑफीसमध्ये चालू होणार असल्याचे मत माजी नगरसेविका सारिका नितीन बो-हाडे यांनी व्यक्त केले. तर तर खासदार अमोल कोल्हे यांनीही या पोस्ट कार्यालयासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com