esakal | राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांचे संचलन
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांचे संचलन

सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (ता. 31) शहरात संचलन केले.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांचे संचलन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शनिवारी (ता. 31) शहरात संचलन केले. देशभक्तिपर गीतांच्या संगीतावर हे संचलन करण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातून सुरू झाले. पुढे काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, मोरवाडी चौक येथून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर संचलनाचा समारोप झाला. यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या दोन; तर राज्य राखीव पोलिस दलाचे एक, असे एकूण तीन प्लाटून होते. तसेच, बॅण्ड पथकानेही सहभाग घेतला. सायंकाळी पाचच्या सुमारास खंडोबा माळ चौकातून संचलनाला सुरुवात झाली. सव्वा पाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात संचलनाचा समारोप झाला.