
पिंपरी : ‘‘चिखली-कुदळवाडी भागांतील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांवर महापालिकेने कारवाई केली आहे. मात्र, त्यांच्याकडून करवसुलीही केली आहे. कारवाईनंतर लघुउद्योगांवर परिणाम झाला आहे. त्याचा सविस्तर अहवाल उपलब्ध करून द्यावा,’’ अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.