Pune Lonavala Local : पुणे-लोणावळा दुपारची लोकल सुरू करण्याची खासदार बारणे यांची रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे मागणी
Shrirang Barne : खासदार श्रीरंग बारणे यांनी पुणे-लोणावळा लोकल पुन्हा सुरू करण्याची आणि कोरोना काळात बंद झालेल्या थांब्यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली असून, लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
तळेगाव दाभाडे : ‘‘पुणे-लोणावळा ही दुपारी दीड वाजताची लोकल आणि कोरोना काळात बंद केलेले थांबे पुन्हा सुरू करावेत,’’ अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.