मावळातील 'या' प्रश्नावर खासदार बारणेंनी लोकसभेचं लक्ष वेधलं, काय म्हणाले ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

  • मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली लोकसभेत मागणी 

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान, अशी अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने एक योजना तयार करावी. तसेच त्यामध्ये रेल्वे सुविधा, पार्किंग व्यवस्था, मनोरंजनाची साधने आदी सुविधा देण्यात याव्यात, जेणेकरून देश-विदेशातून पर्यटकांचा ओघ वाढेल आणि त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. युवकांच्या हाताला काम देण्याची सरकारची घोषणा पूर्ण होईल, असे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खासदार बारणे म्हणाले, "मावळ ही ऐतिहासिक भूमी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात ऐतिहासिक कार्ला लेणी, लोहगड, तुंग, तिकोना, राजमाची, विसापूर हे किल्ले आहेत. या किल्ल्यांची पुरातत्व विभागामार्फत सुधारणा करणे आवश्‍यक आहे. ही सुधारणा झाल्यानंतर किल्ल्यांवरील पर्यंटकांमध्ये निश्‍चितच वाढ होईल.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक नागरिक पर्यटनासाठी विदेशात जातात. मात्र, आपल्या देशातही ऐतिहासिक वारसा असलेली पर्यटनस्थळे मोठ्या प्रमाणात आहेत. केंद्र सरकारने त्यासाठी आर्थिक साहाय्य देऊन त्या पर्यंटनास्थळांचा विकास करावा. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल. तसेच, विदेशी पर्यटक देखील भारतात पर्यटनासाठी येतील. स्थानिक लोकांना रोजगार मिळेल. युवकांच्या हाताला काम देण्याची सरकारची घोषणा पूर्ण होईल, याकडेही खासदार बारणे यांनी लक्ष वेधले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Shrirang Barne's demand in Lok Sabha that central government should provide funds to boost tourism in Maval