esakal | #PuneRains : जुनी सांगवीत उद्यानातील प्ले ग्राउंड बनले स्विमिंग पूल; खोदकामामुळे रस्त्यांवर चिखल
sakal

बोलून बातमी शोधा

#PuneRains : जुनी सांगवीत उद्यानातील प्ले ग्राउंड बनले स्विमिंग पूल; खोदकामामुळे रस्त्यांवर चिखल

जुनी सांगवीसह नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात बुधवारी (ता. १४) झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची दुसऱ्या दिवशीही तारांबळ उडाली.

#PuneRains : जुनी सांगवीत उद्यानातील प्ले ग्राउंड बनले स्विमिंग पूल; खोदकामामुळे रस्त्यांवर चिखल

sakal_logo
By
रमेश मोरे

जुनी सांगवी : जुनी सांगवीसह नवी सांगवी, पिंपळे गुरव, दापोडी परिसरात बुधवारी (ता. १४) झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांची दुसऱ्या दिवशीही तारांबळ उडाली. जुनी सांगवी येथील मधुबन सोसायटीतील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात प्ले ग्राउंडमधे पाणी साचले आहे. त्यामुळे त्याला स्विमिंग पुलाचे स्वरूप आले आहे. दापोडीत पाण्याचा निचरा न झाल्याने येथील सखल भागातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील गुरव पट्टा, आजगावकर चाळ, श्रीवस्ती कॉलनी, सरस्वती अनाथ आश्रम, चिंतामण काटे चाळ, जाधव चाळ, पिलाजी काटे चाळ, महात्मा फुलेनगर येथे ड्रेनेज तुंबल्याने गल्ल्यांमधे पाणी साचले. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले. याबाबत येथील रवी कांबळे म्हणाले, "येथील गटारे वेळोवेळी स्वच्छ केली जात नसल्याने पाऊस पडल्याने कचरा चिखल अडकून पाणी तुंबण्याचा प्रकार घडतो."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रस्ते खोदकामामुळे रहदारीस अडथळा

नवी सांगवी, पिंपळे गुरव व जुनी सांगवी परिसरात रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे रस्ते खोदले असून, तेथे पावसामुळे चिखल झाला आहे. नागरिकांना त्यातून वाट काढावी लागली. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईनचेही कामे सुरू आहेत. पिंपळे गुरव व नवी सांगवीतील माहेश्वरी चौक ते दापोडी पिंपळे गुरव महाराजा हॉटेलपर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना रहदारीसाठी अडथळे आले.