महापालिका आयुक्त व महापौरांच्या पथकालाच 'ते' पोलिस समजले अन्...

महापालिका आयुक्त व महापौरांच्या पथकालाच 'ते' पोलिस समजले अन्...
Updated on

पिंपरी : महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि महापौर उषा ढोरे यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नाल्यांची पाहणी बुधवार पासून सुरू केली आहे. आज त्यांचा दौरा सांगवी परिसरात होता. नदी काठच्या परिसरातील झोपडपट्टी सर्व जण शिरले. एका पत्राशेडमधून नदीकडे जायला निघाले. त्या शेडमध्ये ऑनलाईन मटका व लाॅटरीचा प्रकार सुरू होता. ते खेळणारे व घालवणारे तिथे होते. पोलिसांचा छापा पडला असे समजून पैसे व चिठ्ठ्या जागेवर टाकून सर्वजण पळून गेले. राजरोसपणे सुरू असलेला हा प्रकार पोलिसांना कसा दिसत नाही, अशी चर्चा मात्र नाले पाहणी पथकात रंगली.

औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात ओपन आणि  क्लोज मटका  चांगलाच जोमात चालला असून लाखो रूपयाची उलाढाली बरोबर  वरीष्ठाचे उखळ पांढरे करणार्‍या व अनेकांची घरे व कुटुंबे  उध्वस्त करणारा हा मटका कोणाच्या  आशिर्वादावर सुरू आहे ? याचा प्रत्यय आज सांगवी भागात महापालिका आयुक्त यांच्या सोबत मान्सुन पुर्व पुर नियंत्रण प्रभाग पाहणी दौऱ्यावर असलेल्यांना आला.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे तसेच संबधित अधिकारी यांनी सांगवी भागातील नदीलगतच्या भागात मान्सुन पुर्व पुर नियंत्रण कामाची पाहणी करीत होते. एका पत्रा शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. म्हणून प्रत्यक्ष जावून पाहणी केली असता काही जणाकडे असणाऱ्या मटक्याच्या चिठ्ठ्या, रोख रक्कम व तत्सम साहित्य त्याच ठिकाणी टाकुन पसार झाले.

पत्राशेडमध्ये विविध मटका बाजाराचे बोर्ड लावलेले व त्यावर ओपन क्लोज नंबर असलेले आढळून आले. अशाच प्रकारे शहरात अवैध मटका, जुगार, सोरट असे मोठ्या प्रमाणात गैरप्रकार चालु असणार आहेत. शहरात कोरोनाचे सावट असताना याकडे मात्र पोलीस प्रशासनाकडुन जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात गरीबांना शोषित केले जात आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष   देणार का ?  असा प्रश्न उपस्थित झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी चिंचवड शहरातील अशा प्रकारचे मटक्याचे धंदे अनेक ठिकाणी सुरु असण्याची शक्यता आहे. मटक्यामुळे या शहरातील अनेक गोरगरीब नागरिकांचे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून  मटक्यासाठी  अनेक  कुटुंबात कौटुंबिक कलह वाढत आहेत हे असेच सुरु राहिले तर अनेक गोरगरीब कुटुंबे व शहरातील युवक या मुळे  बरबाद  होण्याची भिती आहे, तरी पोलीस यंत्रणेने या अवैध मटका धंद्याकडे वेळीच लक्ष घालुन असा मटका  तातडीने बंद करावा, याबाबतच्या सुचना सत्तारुढ पक्षनेते  ढाके यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com