पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेची ऑनलाइन शाळा भरलीच नाही!

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेची ऑनलाइन शाळा भरलीच नाही!
Updated on

पिंपरी : शाळा व वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह आंब्यांच्या पानांचे बांधलेले तोरण.. वर्गाच्या बाहेरच मिकी-माऊस, डोरेमोन, छोटा भीमसह आलेली मंडळी.. कुठे विद्यार्थ्यांचे औंक्षण; तर कुठे गुलाब पुष्प देऊन स्वागत.. वर्गात नानाविध खेळणी आणि खाऊचीही रेलचेल.. तरीही मुलांचा उतरलेला चेहरा आणि पालकांनी चिमुरड्यांना शिक्षकांच्या हाती सोपवत घेतलेला काढता पाय.. असे अनेक वर्षापासूनच चालत आलेले 'रूटिन' चित्र शहर परिसरात सोमवारी (ता. 15) पहायला मिळालेच नाही. अनेक शाळांमध्ये ऑनलाइन शाळा भरली, पण महापालिकेची ऑनलाइन 'शाळा' भरलीच नाही. अनेकांचे पालक मजूर असल्याने शिक्षकांनी पाठवलेला गृहपाठ सायंकाळीच पचायला मिळाला.

दरवर्षी 15 जूनला शाळा सुरू होतेच, पण यंदा कोरोनामुळे सगळे चित्र पूर्णपणे बदलले आहे. गेल्या तीन महिन्यापासून शाळा बंद आहेत, नेमक्‍या शाळा कधी सुरू होतील, कशा पद्धतीने करता येतील, यावर चर्चा सुरूच आहे. पण अशातच आज (ता. 15) पासून खासगी शाळांनी ऑनलाइन क्‍लास भरविला. महापालिका प्रशासनानेदेखील खासगी शाळांच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी "दीक्षा ऍप'च्या माध्यमातून "व्हर्च्युअल क्‍लासरूम' भरण्यासाठी चंग बांधला, पण मुळातच महापालिका शाळेत श्रमिकांची मुले शिकत असल्यामुळे बहुतांशी मुलांना पालक घरी परतण्याच्या वेळेवर अवलंबून आहे. त्यामुळे शाळेचा पहिला दिवस असाच गेला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यार्थी व पालकांना सगळी पद्धती शिकण्यासाठी वेळ लागणार आहे. मात्र, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा "व्हॉटसऍप' ग्रुप तयार केला आहे. जुनेद बागवान, सखाराम डहाळे यांनी दोन "ब्लॉग' तयार केले आहेत. विनायक शिरतर, प्रमोद आरवेकर, सुरेश मिसाळ, जबीन सय्यद, सुरेखा मोरे या तंत्रस्नेही शिक्षकांनी इयत्तेप्रमाणे अभ्यासक्रम लोड केला आहे. पण महापालिकेच्या शिक्षकांनी कोरोना ड्यूटी, इलेक्‍शन ड्यूटी, तांदूळ वाटप आदी कामे असल्यामुळे सगळेजण आपापल्या सोयीनुसार ब्लॉगसाठी अभ्यासक्रम उपलब्ध करणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या शाळांना "रूटीन' बसायला वेळ लागणार असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा भरल्याच नाहीत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पहिल्या दिवशी पुस्तकांचे वाटप

प्रातिनिधीक स्वरूपात निगडी मुले क्रमांक एकमध्ये महापौर उषा ढोरे, उपसभापती मनीषा पवार, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, समिती सदस्या रेखा दर्शले, शर्मिला बाबर, पर्यवेक्षक रवींद्र शिंदे, अनिता जोशी, विलास पाटील, प्रदीप शिंदे यांच्या उपस्थितीत मोजक्‍या विद्यार्थ्यांनी "ऑनलाइन' शिक्षणाचा श्रीगणेशा केला. विद्यार्थ्यांना क्रमिक पाठ्यपुस्तके, शिल्लक तांदूळ वाटप करण्यात आले. मुलांनी पोवाडा सादर केल्याबद्दल त्यांचे गुलाब पुष्प देऊन कौतुक केले. मुख्याध्यापिका माणिक किर्वे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजय येणारे व अनिता विधाटे यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com