चोर समजून मजुराचा खून; तिघे अटकेत

चोर समजून तरुणाचा खून केल्याची घटना जांबे येथे घडली.
murder
murderesakal
Summary

चोर समजून तरुणाचा खून केल्याची घटना जांबे येथे घडली.

पिंपरी - चोर समजून तरुणाचा खून केल्याची घटना जांबे येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

राजू यादव (वय ३२, ओरिसा) असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी वैभव पंडित गायकवाड (वय २४, रा. जांबे ), समाधान परिहार (रा. जांबे), निखिल जयस्वार (रा. थेरगाव ) अशी अटक केलेल्या या आरोपींची नावे आहेत. यादव हा जांबेतील रसिकवाडी येथे फिरत असताना आरोपींनी चोर समजून त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी उघडकीस आली. राजू हा मजुरीचे काम करायचा. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा दाखल करून आरोपींना अटक केली. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com