पिंपरी-चिंचवड : पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याने तरुणावर कोयता, लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत प्राणघातक हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली.

पिंपरी - पूर्ववैमनस्यातून टोळक्‍याने तरुणावर कोयता, लाकडी दांडक्‍याने मारहाण करीत प्राणघातक हल्ला केला. ही घटना चिंचवड स्टेशन येथे घडली. 

नितीन गवळी (वय 21), विकास गायकवाड (वय 23), अमोल गंगाराम सोनवणे (वय 22), अतीष सोनवणे (वय 23), शुभम अडागळे (वय 25), अजय थोरात (वय 24), अभिजित सरोदे (वय 22), अनुराग गवळी (वय 23, सर्व रा. चिंचवड स्टेशन) यासह त्यांच्या आणखी साथीदारांवर गुन्हा दाखल आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी सुरजा ऊर्फ ससाराज राजू वाघमारे (रा. जगतापनगर, थेरगाव) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (ता. 26) दुपारी दोनच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील दवा बाजार येथे आरोपींनी बेकायदा जमाव जमविला. जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच कोयता, लाकडी दांडके, बांबू व हाताने बेदम मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murderer attack on youth in pimpri chinchwad crime

Tags
टॉपिकस
Topic Tags: