पिंपरी : चिखलीतील घरकुलांची होतेय परस्पर विक्री

महापालिका प्रशासनातील अनागोंदी कारभार
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal Corporationsakal

पिंपरी : प्रत्येकाला आयुष्यात हक्काचं घर हवं असतं. परंतु, महापालिकेकडून मिळालेली हक्काची घरे आर्थिक हव्यासापोटी परस्पर दुसऱ्याला विकली जात आहेत. महापालिकेने चिखली प्राधिकरणात घरकुल योजनेअंतर्गत घरे बांधून दिली. परंतु, महापालिका प्रशासनातील अनागोंदी कारभारामुळे घरांची जोरदार विक्री सुरुच आहे. शिवाय आतापर्यंत ३० टक्के घरे भाड्याने दिली आहेत. ( Mutual sale houses in Chikhali)

चिखलीतील प्राधिकरण सेक्टर १७ व १९ घरकुलमध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेतून (Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission) सहा हजार ७०० घरे दिली. १६० इमारती या परिसरात आहेत. एका इमारतीत ४२ फ्लॅट असून, रीतसर सोडत पद्धतीने सर्वांना घरे मिळाली आहेत. घर मिळाल्यानंतर सर्वांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. घरकुलाच्या सोडतीसाठी पदाधिकाऱ्यांनी जाहीर कार्यक्रम केले. आता या सदनिकांचा वापर व्यावसायिक वापरासाठी मोठ्या शिताफीने केला जात आहे. सध्या घरे विकताना पॉवर ऑफ ॲटॉर्नी म्हणजेच मुखत्यारपत्र केली जात आहेत. यातील बऱ्याच नागरिकांनी स्वस्तातील घरकुले विकून पैसा कमावला आणि चांगल्या ठिकाणी दुसरीकडे घरे खरेदी केली आहेत. घरकुलमध्येच या व्यवहारांची जोरदार चर्चा सुरू आहे.

काही एजंट यामध्ये सक्रिय आहेत. झोपडपट्टी भागातील काही नागरिकांमध्ये यावरून वाद होत आहेत. तर, काही परस्पर घरांची विक्री केलेल्या नागरिकांमध्ये वाद उद्भवत आहेत. एकदा घरकुलातील घर विकून सोडून गेलेले काहीजण पुन्हा घरकुलासाठी नोंदणी करून घरे बळकावण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेतर्फे चऱ्होली, रावेत व मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे गृहप्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांचेही काम प्रगतिपथावर आहे. आर्थिक-दुर्बल घटकातील व्यक्तीसाठी या योजनेचा लाभ मिळणार आहे. एकूण तीन हजार ६६४ घरांची योजना आहे. परंतु, याठिकाणी देखील परस्पर घरे विकली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळत आहे. गरजू खरेदीदाराला कारवाई न होण्याची हमी दिली जात आहे. बोगस पद्धतीने घर खरेदी केलेल्या नागरिकांकडे कागदपत्रे नाहीत. योग्य ते पुरावे नाहीत.

विक्री झालेल्या घरांचे चर्चेतील नंबर

ए ९, ए ६, ए ११, ए १९, ए २०, ए ३२, ए २८, ए २९, ए ३४, बी १३, बी १६, बी १८, बी १९, बी ३४, सी १, सी २, सी ३, सी ४, सी ५, सी १०, सी १७, सी १८, सी २०, सी २२, सी २७, सी २८, सी ३२, सी ३४, एफ ३, एफ ४, एफ ७ अशा सुमारे शंभरच्यावर फ्लॅटची विक्री झाली आहे. हे सर्व फ्लॅट वन बीएचके आहेत. घरे खरेदी करताना ३.७६ लाख किंमत होती. ती सुमारे ८ लाखांच्या दराने विकली गेली आहेत. यातील काही फ्लॅट अद्यापही विकण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मिळत आहे.

झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे घरकुल सहायक आयुक्त अण्णा बोदडे यासंदर्भात म्हणाले, "करारनाम्यातील अट क्र. १० नुसार लाभार्थ्याला दहा वर्षापर्यंत घरांची विक्री करता येत नाही. तसेच, भाडेतत्त्वावरही देता येत नाहीत. असा प्रकार आढळून आल्यास महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात येईल. लवकरच या भागातील सर्वेक्षण करण्यात येणार आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com