पिंपरी-चिंचवडमध्ये 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा प्रारंभ महापालिकेतर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी झाला.

पिंपरी : कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेचा प्रारंभ महापालिकेतर्फे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. सांगवी येथे प्रत्यक्ष गृहभेट घेवून तपासणी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोना नियंत्रण, मृत्यूदर कमी करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश असून, त्या अंतर्गत घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. नागरिकांना आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे. मोहिमेचा प्रारंभ करताना महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक संतोष कांबळे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, सांगवी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. विनया आंबेडकर, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सिनेट सदस्य संतोष ढोरे आदी उपस्थित होते. 

बिजलीनगरमध्येही प्रारंभ 

महापालिका प्रभाग 17 शिवनगरी, बिजलीनगर येथेही मोहिमेअंतर्गत गृहभेट देवून तपासणी करण्यात आली. यासाठी तीन सदस्यीय पथकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्याद्वारे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या मोहिमेसाठी नागरिकांनी स्वतःहुन पुढाकार घेऊन प्रतिसाद द्यावा. तसेच, आपल्या बरोबरच आपल्या कुटुंबांची तपासणी करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. महापौरांसह ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, नगरसेवक राजेंद्र गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, सुरेश भोईर, मोरेश्‍वर शेडगे, स्वीकृत सदस्य बिभीषण चौधरी, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, डॉ. सुनील जॉन, डॉ. विनादेवी गंभीर, डॉ. किशोरी नलावडे, डॉ. प्रियांका सर्वज्ञ, आदेश नवले, योगेश चिंचवडे, प्रमोद चौधरी, शंकर पाटील, प्रदीप पटेल, कैलास रोटे, वसंत नारखेडे, संजय माळी आदी उपस्थित होते. 

भोसरीतही प्रारंभ 

भोसरी येथे स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या उपस्थितीत मोहिम सुरू झाली. अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेजा भावसार, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My Family, My Responsibility campaign launch in Pimpri-Chinchwad